शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

नदीसुधार प्रकल्प पिंपळे निलखच्या नागरिकांना महागात; पहिल्याच पावसात सांडपाणी घरात 

By विश्वास मोरे | Updated: May 10, 2025 19:05 IST

पंचशीलनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.  

पिंपरी : पिंपळे निलख परिसरामध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी भराव टाकण्यात आलेला आहे. जुन्या वाहिन्या फुटल्या आहे. त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये नदीला जोडणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्या होत्या. त्यामुळे पंचशीलनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.  पिंपरी-चिंचवडच्या सीमेवर असणाऱ्या पिंपळे-निलख भागामध्ये मुळानदी सुधारचे काम सुरू झाले आहेत. त्यासाठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकला आहे. त्याचबरोबर काँक्रीटीकरण सुरू आहे.  हे काम करत असताना जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या गाडल्या गेल्या आहेत. काही तुटलेल्या आहेत.विशालनगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या पुलाच्या अलीकडे पंचशीलनगर आहे. या भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पावसामध्ये मैला सांडपाणी वाहिन्या तुंबल्या. त्यामुळे पंचशीलनगरमधील सुमारे ५० ते ६० घरांमध्ये पाणी शिरले आहे. मैला सांडपाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अतुल खरात म्हणाले, 'या भागामध्ये नदी सुधारचे काम आहे.  आणि त्यासाठी जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या बुजवल्या गेल्या आहेत. पहिल्याच पावसामध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यात मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, 'नदी सुधारच्या नावाखाली नदी बुजवण्याचे काम सुरू आहे. याकडे नागरिकांनी लक्ष वेधूनही कोणीही कुणीही दखल घेत नाही. परिणामी पहिल्याच पावसामध्ये पंचशीलनगरमध्ये पाणी शिरले होते. नागरिकांच्या घरात सांडपाणी घरांमध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला कळवले होते. अजून पावसाळा सुरु झालेल्या नाही. पहिल्याच पावसात जर अशी अवस्था होत असेल तर महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.'   इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे नुकसान अचानक जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिंपळे निलख भागातील सखल भागात पाणी साचले होते. त्यातून वाहने काढताना चालकांना कसरत करावी लागली. सांडपाण्याच्या वाहिन्या, पावसाळी पाणी वाहून जाणारी गटारे तुंबल्याने घरात पाणी शिरले. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू साहित्याचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे