Pimpari-chinchwad : शहरात पावसाच्या सरी; रस्त्यांवर पाणी साचले; वाकड, हिंजवडी मार्गावर वाहतुकी कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 16:07 IST2025-09-28T16:06:47+5:302025-09-28T16:07:04+5:30
वाकड, हिंजवडी तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी मार्गावर सायंकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी झाली.

Pimpari-chinchwad : शहरात पावसाच्या सरी; रस्त्यांवर पाणी साचले; वाकड, हिंजवडी मार्गावर वाहतुकी कोंडी
पिंपरी : शहरात शनिवारी सकाळपासूनच बरसणाऱ्या पावसाच्या सरींनी बहुतेक भागांत पाणी साचले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
सकाळपासून काही भागांत संततधार पाऊस झाला. वाकड, हिंजवडी तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी मार्गावर सायंकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही भागांत पावसाचे पाणी साचल्याने वृद्ध आणि लहान मुलांसह नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणी साचलेल्या भागांत पंपिंग मशीनद्वारे पाणी काढण्याचे काम ताबडतोब सुरू केले. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले, "पावसामुळे झालेल्या अडचणींवर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी घरातच राहावे आणि महापालिकेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे."
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी कमाल तापमान २९ अंश तर किमान २२ अंश राहिले. पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले. रविवारीही पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला.