शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Power Outage: भोसरी, पिंपरीतील वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत; महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:41 IST

Pimpari-Chinchwad Bhosari Power Outage: पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न 

पिंपरी :महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण)च्या भोसरी येथील २२० के. व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये रविवारी (दि. १५) रात्री अकराच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला. परिणामी, या रोहित्रावर अवलंबून असलेला सुमारे ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला. त्यामुळे भोसरी व पिंपरी विभागातील अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला. पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

या बिघाडामुळे एस ब्लॉक, जे ब्लॉक, डी-२ ब्लॉक, एफ-२ ब्लॉक, टी ब्लॉक, इंद्रायणी नगर, भोसरी गाव, जलवायू विहार, गंधर्व नगरी, सेक्टर ६ व ४, नेहरू नगर, संत तुकाराम नगर, दापोडी आणि कासारवाडी या भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. याच उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये दि. २ फेब्रुवारी रोजीही अंतर्गत बिघाड झाला होता. त्यावेळी महावितरणच्या भोसरी व पिंपरी विभागामार्फत पर्यायी यंत्रणेद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते.

सद्यस्थितीतही पर्यायी व्यवस्थेद्वारे इतर वीज वाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र, अतिरिक्त भारामुळे काही ठिकाणी तात्पुरते व्यत्यय येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच वीज ग्राहकांनी संयम बाळगून विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एमआयडीसीतील लघु उद्योजक हैराण

पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील वीज समस्येने लघु उद्योजक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. एमआयडीसी भागात अखंडित वीजपुरवठा कधी होणार? असा सवाल पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उपस्थित केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhosari, Pimpri Power Supply Disrupted Again Due to Substation Fault

Web Summary : Bhosari and Pimpri face power disruptions after a substation fault. Alternative arrangements are in progress, but temporary outages may occur. Industries are suffering losses. Users are urged to conserve electricity.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPower Shutdownभारनियमन