मेट्रोत ‘हरवले-सापडले’चा वाढता आलेख; ९३० वस्तू मेट्रो प्रवासात सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:00 IST2026-01-27T13:55:15+5:302026-01-27T14:00:05+5:30

- ३८७ तक्रारींची सोडवणूक, मोबाइल, पाकीट, बॅग सर्वाधिक, ३४ तक्रारींतील वस्तू गहाळच

pimpari-chinchwad metro news Growing graph of 'lost and found' in Metro; 930 items found during Metro journey pimpari-chinchwad | मेट्रोत ‘हरवले-सापडले’चा वाढता आलेख; ९३० वस्तू मेट्रो प्रवासात सापडल्या

मेट्रोत ‘हरवले-सापडले’चा वाढता आलेख; ९३० वस्तू मेट्रो प्रवासात सापडल्या

रवींद्र जगधने 

पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा ठरत असलेल्या पुणेमेट्रोचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना, प्रवासादरम्यान प्रवाशांच्या वस्तू हरवण्याचे प्रकार समोर येत आहेत. पुणेमेट्रो विविध मेट्रो स्थानकांवर एकूण ९३० हरवलेल्या वस्तू सापडल्या असून, त्यातील ३८७ तक्रारींचा निपटारा केला आहे. तर उर्वरित वस्तू सुरक्षितरीत्या मेट्रो प्रशासनाकडे ठेवल्या आहेत. तर ३४ तक्रारी गहाळ वस्तूंबाबत आहेत.

मेट्रो प्रवासात घाई, गर्दी तसेच निष्काळजीपणामुळे प्रवाशांकडून मोबाइल फोन, पाकीट, बॅग, लॅपटॉप, टिफीन बॉक्स, चष्मे, दागिने अशा वस्तू मागे पडत असल्याचे आढळले आहे. यामध्ये मोबाइल व पाकीट हरवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वस्तूंची नोंद करून त्या स्थानकात जतन करण्यात येतात.

जिल्हा न्यायालय स्थानक पहिल्या क्रमांकावर

हरवलेल्या वस्तूंच्या संख्येत जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक आघाडीवर असून, येथे तब्बल २१४ वस्तू जमा झाल्या आहेत. त्याखालोखाल स्वारगेट (१०१), संत तुकारामनगर (५७), मंडई (५७) आणि महापालिका (५४) या स्थानकांचा क्रम लागतो. वर्दळीची ठिकाणे असल्याने येथे हरवलेल्या वस्तूंचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होते.

३८७ तक्रारींचा निपटारा

मेट्रो प्रशासनाकडून सुमारे ३८७ तक्रारी सोडविल्या आहेत. संबंधित प्रवाशांना वस्तू परत केल्या आहेत. काही तक्रारी अद्याप प्रलंबित असून, संबंधित प्रवाशांनी आवश्यक ओळखपत्रांसह मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तर मेट्रोकडे गहाळ वस्तूबाबत ३४ तक्रारी केल्या आहेत.

प्रवासादरम्यान नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहावे, तसेच वस्तू हरवल्यास तत्काळ मेट्रो प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असेही मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हरवले-सापडले : एकूण जमा वस्तू : ९३०

आघाडीवरील मेट्रो स्थानके :

जिल्हा न्यायालय - २१४

स्वारगेट - १०१

संत तुकाराम नगर - ५७

मंडई - ५७

पिंपरी चिंचवड महापालिका - ५४

.............

सर्वाधिक हरवणाऱ्या वस्तू :

- मोबाइल फोन

- पाकीट (वॉलेट)

- बॅग व लॅपटॉप बॅग

- टिफीन बॉक्स

- चष्मे व दागिने

.........

मेट्रो प्रवासादरम्यान सापडलेल्या वस्तू मेट्रो स्थानकात जमा केल्या जातात. ओळख पटल्यास या वस्तू मूळ मालकाला परत दिली जातात.  - चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो

Web Title : पुणे मेट्रो में 'खोया-पाया' का ग्राफ बढ़ा: 930 वस्तुएं मिलीं

Web Summary : पुणे मेट्रो में यात्रियों का सामान खोने की घटनाएं बढ़ीं; 930 वस्तुएं मिलीं, 387 मामले निपटाए गए। जिला न्यायालय स्टेशन पर सबसे ज्यादा सामान मिला। मोबाइल फोन और वॉलेट सबसे अधिक खोए गए। यात्रियों से सतर्क रहने का आग्रह।

Web Title : Lost and Found Items Rise on Pune Metro: 930 Recovered

Web Summary : Pune Metro sees a rise in lost items; 930 recovered, 387 claims resolved. District Court station tops lost item locations. Mobile phones and wallets are most frequent losses. Passengers urged to be cautious.