Pimpari Chinchwad Crime: मोबाईल हॅक करून फळविक्रेत्याची साडेपाच लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:37 IST2026-01-30T13:32:43+5:302026-01-30T13:37:22+5:30
फळविक्रेत्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आली

Pimpari Chinchwad Crime: मोबाईल हॅक करून फळविक्रेत्याची साडेपाच लाखांची फसवणूक
पिंपरी : मोबाईल फोन हॅक करून थेट बँक खात्यावर नियंत्रण मिळवत एका फळविक्रेत्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही फसवणूक २३ डिसेंबर रोजी करण्यात आली.
अभिजित किशनराव कृष्णाजी (वय २९, रा. पिंपळे सौदागर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अज्ञात सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये घुसखोरी करत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा ताबा मिळवला.
यानंतर ट्रान्झॅक्शन आयडीचा गैरवापर करत तब्बल ५ लाख ५० हजार रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळवण्यात आले. खात्यातील रक्कम अचानक कमी झाल्याचे लक्षात येताच अभिजित यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
सांगवी पोलिसांनी संबंधित बँक खातेधारक आणि मोबाईल क्रमांकधारकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सायबर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. वाढत्या ऑनलाईन व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.