मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:47 IST2025-04-09T14:46:41+5:302025-04-09T14:47:04+5:30

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आठ ते दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली

pimpari-chinchwad FIRE Massive fire breaks out at wood warehouse in Moshi Loss of lakhs | मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

मोशी - मोशी परिसरातील एका लाकडाच्या वखारीला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत वखारीतील लाकूड, भंगार व इतर साहित्य पूर्णपणे खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे लोळ व धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.

आगीची माहिती मिळताच मोशी, भोसरी, तळवडे, चाकण आणि पिंपरी चिंचवड येथील अग्निशमन दलाच्या तब्बल १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आठ ते दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, अद्याप पूर्णपणे आग विझलेली नसून घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे.

अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी अजूनही घटनास्थळी उपस्थित असून, आग पुन्हा भडकू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. वखारीच्या परिसरात जेसीबीच्या सहाय्याने राख हटवण्याचे काम सुरू आहे.
 

मोशी येथे लाकडाचा वखारीला भीषण आग लागली होती. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. आठ तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली आहे. पण अद्याप पूर्ण आग विझलेली नाही घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान कुलिंगचे काम करत आहेत. - विनायक नाळे,मोशी ,अग्निशमन उपकेंद्र 

Web Title: pimpari-chinchwad FIRE Massive fire breaks out at wood warehouse in Moshi Loss of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.