तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:52 IST2025-08-19T13:51:50+5:302025-08-19T13:52:14+5:30
नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयातील आवक - जावक विभागांमध्ये त्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली असून नागरिकांच्या माहितीसाठी याचा तपशील सोमवारी (दि.१८) नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदेच्या Talegaondabhademc.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी रविवारी (दि.३१) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयातील आवक - जावक विभागांमध्ये त्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे, आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असेही मुख्याधिकारी सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.