शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित

By विश्वास मोरे | Updated: May 27, 2025 11:28 IST

शेतकरी, नागरिक हवालदिल : रस्ते, शाळा, मैदानाचे आरक्षण; यमुनानगर, रावेत, मामुर्डीलाही फटका, तळवडे आयटीपार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपो, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स विविध आरक्षणे प्रस्तावित

पिंपरी : देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या सीमेवर असणाऱ्या तळवडे, यमुनानगर, विकासनगर, रावेत, मामुर्डी परिसरात रेड झोन रेषेचे सीमांकन केले आहे. विकास आराखड्याच्या नकाशातील रेड झोन कायम झाल्यास मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बाधित होणार आहे. सर्वाधिक फटका तळवडे परिसरास बसणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील आणि देहूरोड, देहूगावच्या प्रवेशद्वारावर असणारे गाव म्हणजे तळवडे. हा देहूरोड येथील दारूगोळा कारखान्याच्या लगतचा परिसर आहे. सुरुवातीला तळवडेकरांची जमीन लष्करात आणि त्यानंतर तळवडे माहिती-तंत्रज्ञान नगरीसाठी तसेच एमआयडीसीमध्ये संपादित केली गेली.

रस्ते आणि सार्वजनिक सुविधांची टाकली आरक्षणेरेड झोन असल्याने सार्वजनिक सुविधांची आरक्षणे आहेत. १८ मीटर रस्ते प्रस्तावित केले आहेत. टाउन हॉल, खेळाचे मैदान, माध्यमिक व प्राथमिक शाळा, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रसूतिगृह, रुग्णालय अशी विविध आरक्षणे प्रस्तावित आहेत. औद्योगिक क्षेत्राचेही आरक्षण दिसते. नागरी वस्तीत रहिवासी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तळवडेचा मोठा भाग रेड झोनमध्ये दिसून येतो.उर्वरित क्षेत्रामध्ये नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले आहे. आता तळवडे आयटी पार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपोचे आरक्षण प्रस्तावित केले आहे. तळवडे एमआयडीसीमधूनही रेड झोनची रेषा दर्शविण्यात आली आहे. त्यात ती पुढे तळवडे गावठाणाबाहेरून नदीला स्पर्शन गणेशनगर, सोनवणेवस्ती, ज्योतिबानगर आणि स्पाईन रोडमार्गे यमुनानगर, प्राधिकरण परिसरापर्यंत जाणार आहे.  

अधिकृत नकाशे अद्याप प्रसिद्ध केले नाहीतलष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेड झोन नकाशे जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यापूर्वीच महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये रेड झोन रेषा प्रस्तावित केली आहे. सध्या अधिकृत नकाशे प्रकाशित करण्यात आले नाहीत.

परिसरात महत्त्वपूर्ण इतर आरक्षणे नाहीतरेड झोनमुळे इतर कोणतेही महत्त्वपूर्ण आरक्षण टाकलेले दिसून येत नाही. किवळे-विकासनगरचेही मोठे क्षेत्र बाधित आहे. मामुर्डी आणि देहूरोडलाही रेड झोनचा फटका बसणार आहे.

तळवडेचे बहुतांश क्षेत्र रेड झोनमध्ये आहे. आताच्या उपमुख्यमंत्री अजित पवार हा प्रश्न रस्त्यांची नकाशात अधिक क्षेत्र बाधित होत आहे. याबाबत यांची भेट घेऊन मांडण्यात येईल. अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. ती रद्द करावीत. - पंकज भालेकर, माजी नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडReal Estateबांधकाम उद्योग