Crime News : सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून;पिंपरी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:22 IST2025-06-02T16:20:14+5:302025-06-02T16:22:13+5:30
त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विश्वास शिंदेने जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यात मारून मारहाण केली.

Crime News : सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून;पिंपरी येथील घटना
पिंपरी : सिगारेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत तरुणाचा खून केला. पिंपरी येथील विठ्ठल नगरमध्ये रविवारी (दि. १) ही घटना घडली.
अक्षय संजय ठोके (२६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई वंदना संजय ठोके (४५, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्वास भीमा शिंदे (२८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अक्षय ठोके आणि विश्वास शिंदे हे दोघे विठ्ठलनगर भागात एकत्र बसले होते. त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विश्वास शिंदे याने जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यात मारून मारहाण केली.
या मारहाणीमुळे अक्षय ठोके जखमी होऊन कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक गोरख कुंभार पुढील तपास करत आहेत.