पिंपरीत व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाने जीवन संपवले; पोलिस तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:35 IST2026-02-15T16:34:27+5:302026-02-15T16:35:51+5:30
सध्या गुरुद्वारा चौकाजवळील वाल्हेकरवाडी परिसरात मित्रांसोबत राहत होता आणि एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.

पिंपरीत व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाने जीवन संपवले; पोलिस तपास सुरू
पिंपरी-चिंचवड : शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौकाजवळ २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली.
मृत तरुणाचे नाव समर्थ संजय माळी (वय २४) असे असून, तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो सध्या गुरुद्वारा चौकाजवळील वाल्हेकरवाडी परिसरात मित्रांसोबत राहत होता आणि एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी समर्थचे मित्र जेवणासाठी बाहेर गेले होते. या दरम्यान समर्थने घरात गळफास घेतल्याचे सांगितले जाते. मित्र परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर समर्थला तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद चिंचवड पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.