गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:33 IST2025-07-24T20:32:35+5:302025-07-24T20:33:27+5:30

बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले.

pimpari-chinchwad Crime News Teacher-disciple relationship tarnished Teacher commits shameful act with students; Pimpri-Chinchwad city witnessing incident | गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार

पिंपरी : शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी महापालिकेच्या एका संशयीत शिक्षकाला अटक केली. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली. न्यायालयाने संशयित शिक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय ५१, रा. कृष्णानगर, चिखली) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेंद्रे याला अटक करून गुरुवारी (दि. २४ जुलै) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (दि. २६ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले. तसेच वॉशरुमला डोकावून पाहून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ७४, ७८, ११५(२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ९ (एफ), १२, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे तपास करीत आहेत.

Web Title: pimpari-chinchwad Crime News Teacher-disciple relationship tarnished Teacher commits shameful act with students; Pimpri-Chinchwad city witnessing incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.