Crime News : नवीन चप्पल तुटली; दुकानदाराला तुडवले;थेरगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:09 IST2025-06-02T16:07:57+5:302025-06-02T16:09:50+5:30

संशयितांनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन चप्पल तुटल्याचा राग व्यक्त करून वाद घातला.

pimpari-chinchwad crime New slippers broke; shopkeeper trampledI ncident in Pawarnagar, Thergaon | Crime News : नवीन चप्पल तुटली; दुकानदाराला तुडवले;थेरगाव येथील घटना

Crime News : नवीन चप्पल तुटली; दुकानदाराला तुडवले;थेरगाव येथील घटना

पिंपरी : नवीन खरेदी केलेली चप्पल लगेच तुटल्याच्या कारणावरून दुकानदारास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना २१ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे घडली.

विजय रामा वाभळे (वय ३५), राहुल नारायण कांबळे (२२), रविनारायण कांबळे (२७) आणि सिद्धार्थ राजेश वाघुळे (२१, सर्व रा. थेरगाव), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तुषार अशोक तरटे (३२, रा. थेरगाव), असे जखमी दुकानदाराचे नाव असून, त्यांनी शनिवारी (दि. ३१) याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन चप्पल तुटल्याचा राग व्यक्त करून वाद घातला. त्यानंतर हाताने, पायाने मारहाण केली. राहुल कांबळे याने लाकडी काठीने डोक्यात मारून जखमी केले. सर्व संशयितांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत धमकी दिली.

Web Title: pimpari-chinchwad crime New slippers broke; shopkeeper trampledI ncident in Pawarnagar, Thergaon