बॅनर लावण्यावरून वाद; युवकावर कोयत्याने हल्ला;चिंचवड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:29 IST2025-10-10T11:29:14+5:302025-10-10T11:29:39+5:30
Pimpri-Chinchwad Crime: संशयितांसोबत काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीच्या रागातून संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

बॅनर लावण्यावरून वाद; युवकावर कोयत्याने हल्ला;चिंचवड येथील घटना
पिंपरी : बॅनर लावण्यावरून झालेल्या वादातून एका युवकावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवड येथील रामनगरमध्ये घडली.
अक्षय राजू कापसे (रा. मोहननगर, चिंचवड), समीर उर्फ सम्या उत्तम गवळी (वय १९, रा. काळेवाडी), मोन्या उर्फ शशांक अनंत लांडगे (१९, रा. मस्के गस्ती, रावेत), शिवा बाबासाहेब बनसोडे (१९, रा. आंबेडकरनगर, थरमॅक्स चौक) व त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. समीर जाधव असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्या आईने बुधवारी (दि. ८) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा समीर जाधव याचे संशयितांसोबत काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीच्या रागातून संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचाच राग मनात ठेवून त्यांनी कोयता आणि पालघनसारख्या धारदार हत्यारांनी समीरवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.