बांधकाम व्यावसायिक कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 09:49 IST2025-06-14T09:48:47+5:302025-06-14T09:49:28+5:30

कंपनीकडून सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा देण्यास उशीर झाला. त्यामुळे महारेरा कायद्यानुसार कंपनीकडून सदनिकाधारकांना द्यावयाची व्याजाच्या स्वरूपात देय रक्कम आरोपीने स्वत:कडे घेतली.

pimpari-chinchwad Crime against construction company for defrauding company | बांधकाम व्यावसायिक कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा

बांधकाम व्यावसायिक कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा

पिंपरी : बांधकाम व्यावसायिक कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीची २४ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत अँडिशडॅन व्हीटीपी डेव्हलपर्स या कंपनीत घडली.

सौरभ सुनील शिंदे (रा. मार्केट यार्ड, पुणे) आणि इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. रवींद्र वाघू तुपे (वय ४९, रा. आंबेगाव बुद्रूक) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सौरभ शिंदे हा फिर्यादी यांच्या अँशडॅन व्हीटीपी डेव्हलपर्स या कंपनीत काम करत होता.

कंपनीकडून सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा देण्यास उशीर झाला. त्यामुळे महारेरा कायद्यानुसार कंपनीकडून सदनिकाधारकांना द्यावयाची व्याजाच्या स्वरूपात देय रक्कम आरोपीने स्वत:कडे घेतली. तसेच सदनिकाधारकांनी मागणी केलेली कामे करून देण्यासाठी कंपनीचे साहित्य, लेबर वापरून सदनिका धारकांकडून विविध बँक खात्यावर पैसे घेतले. त्यानंतर ते पैसे आरोपीने स्वत:च्या खात्यावर घेत कंपनीची २४ लाख ५५ हजार ५१८ रुपयांची फसवणूक केली.

Web Title: pimpari-chinchwad Crime against construction company for defrauding company