आम्ही इथले भाई..तू या रस्त्याने कसा काय चाललास? सांगत टोळक्याची तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:00 IST2026-01-20T11:58:31+5:302026-01-20T12:00:55+5:30
‘आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा काय चाललास? तुला जाऊ देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारला.

आम्ही इथले भाई..तू या रस्त्याने कसा काय चाललास? सांगत टोळक्याची तरुणाला मारहाण
पिंपरी : भाईगिरीचा आव आणत तरुणाला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांना दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (१८ जानेवारी) सायंकाळी आठच्या सुमारास चाकण परिसरातील कडाची वाडीतील बापदेववस्ती येथील ओमसाई नगरमध्ये घडली.
प्रवीण विष्णू कुंभार (वय ४८, रा. बापदेव वस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुयश राजेंद्र यादव, शिवम संदीप हाके, शुभम संदीप हाके (१८), चिन्मय वाघ, सुदर्शन चौधरी, सोन्या वाघमारे आणि विराज कृष्णा कड (२३, रा. कडाचीवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुंभार रस्त्याने जात असताना संशयितांनी त्यांची गाडी अडवली. ‘आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा काय चाललास? तुला जाऊ देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेले गणेश शेलार आणि प्रतीक शेलार यांच्या डोक्यावरही दगड मारून त्यांना जखमी केले. या टोळक्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी दुकाने आणि घरे बंद करून घेतली होती.