Pimpari Accident: पिंपरीत भरधाव कारचा अपघात; जीवितहानी टळली, पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:44 IST2026-03-17T12:42:59+5:302026-03-17T12:44:20+5:30

Pimpari Accident Video: पोलिसांनी चालकासह कारमधील चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

pimpari-chinchwad accident video Speeding Car Crashes in Pimpri; No Loss of Life, Police Investigation Underway. | Pimpari Accident: पिंपरीत भरधाव कारचा अपघात; जीवितहानी टळली, पोलीस तपास सुरू

Pimpari Accident: पिंपरीत भरधाव कारचा अपघात; जीवितहानी टळली, पोलीस तपास सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील जगताप डेअरी चौकात मंगळवारी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट चौकातील सर्कलवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेत सर्कलचा कठडा अक्षरशः तुटला असून कार त्यावर चढल्याचे दृश्य उपस्थितांनी पाहिले. 



सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता आणि परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालकासह कारमधील चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या दरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, अपघाताच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यासाठी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title : पिंपरी में कार दुर्घटना: कोई हताहत नहीं, पुलिस जांच जारी

Web Summary : पिंपरी में एक तेज रफ्तार कार सर्कल से टकरा गई, जिससे नुकसान हुआ। सौभाग्य से, कोई भी हताहत नहीं हुआ, लेकिन यातायात बाधित हो गया। पुलिस चालक और सवारों की जांच कर रही है, नशे में गाड़ी चलाने का संदेह है।

Web Title : Pimpri Car Accident: No Fatalities, Police Investigate Speeding Vehicle

Web Summary : A speeding car crashed into a circle in Pimpri, causing damage. Fortunately, no one was killed, but traffic was disrupted. Police are investigating the driver and occupants, suspecting drunk driving.