अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Updated: June 28, 2023 14:04 IST2023-06-28T14:03:42+5:302023-06-28T14:04:27+5:30
अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना न देता वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या एका वाहनाने अनोळखी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २६) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास औंध हॉस्पिटल बीआरटी बस स्टॉप जवळ घडली. पोलीस अंमलदार देविदास जाधव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध हॉस्पिटल बीआरटी बस स्टॉप जवळ एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात त्या पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना न देता वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याच्या अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची साधी फुल पँट, पायात काळ्या रंगाचा सँडल घातलेला आहे. सांगवी पोलीस वाहनचालकाचा शोध घेत आहे.