पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 19:42 IST2021-11-22T19:41:41+5:302021-11-22T19:42:43+5:30

पिंपरी : वेगात जाणाऱ्या बसने एका पादचाऱ्याला जोरात धडक दिली. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, हा अपघात शनिवारी रात्री ...

pedestrian dies on the spot in accident on pune nashik highway | पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पिंपरी : वेगात जाणाऱ्या बसने एका पादचाऱ्याला जोरात धडक दिली. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, हा अपघात शनिवारी रात्री साडेसात वाजता मुटकेवाडी चाकण येथे नाशिक-पुणे मार्गावर घडला. रामेश्वर नारायण भोसले (वय ४२, रा. नेपतगाव, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सचिन नेमाजी काळे (वय ३४, रा.नाणेकरवाडी, ता.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बस चालक मनोल चांदभाई शेख (रा.येवती, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत मेहुणा मयत रामेश्वर शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास मुटकेवाडी येथून पुणे-नाशिक महामार्गावरून नाशिक-पुणे या लेनवरून चालत जात होता. त्यावेळी आरोपी बस चालकाने बस भरधाव वेगात चालवून रामेश्वर याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामेश्वरचा मृत्यू झाला.

Web Title: pedestrian dies on the spot in accident on pune nashik highway