PCMC officers threatening due to catch pigs | डुकरे पकडल्याने महापालिकेच्या गाडीवर दगडफेक 
डुकरे पकडल्याने महापालिकेच्या गाडीवर दगडफेक 

पिंपरी : डुकरे पकडली म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गाडीवर दगडफेक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकारणी डॉ. अरूण मारूती दगडे (वय ३४) यांनी बुधवारी (दि. ११) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय ३२, रा. खंडेवस्ती, भोसरी) यास अटक करण्यात आली आहे.


 फिर्यादी डॉ. दगडे हे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी खंडेवस्ती भोसरी येथील डुकरे पकडून पुढील कार्यवाहीसाठी ते जात होते. भोसरी एमआयडीसीत आले असता आरोपीने त्यांची गाडी अडविली व गाडीवर दगड मारला. तुम्हाला पकडायला आमचीच डुकरे मिळतात का, असे म्हणून आरोपीने त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे तपास करीत आहेत.

Web Title: PCMC officers threatening due to catch pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.