शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पवना धरण शंभर टक्के भरले, विसर्ग वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:44 IST

पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरणाचे शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास चार दरवाजे उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे.

ठळक मुद्देपवनाधरणाचे चार दरवाजे  उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु वीस दिवसांत ७० टक्के पाणीसाठा वाढला शेतकऱ्यांसह पिंपरी-चिंचवड शहराला मोठा दिलासा

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण महिनाभरात शंभर टक्के भरले असून, उद्योगनगरीची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास पवनाधरणाचे चार दरवाजे  उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे. यावर्षी मावळातील सर्वच धरणे भरली आहेत. मात्र, पवना धरण भरले असतानाही शहरातील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न कायमच आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मुळशी, खेड आणि मावळ परिसरात यंदा पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. जूनच्या सुरुवातीस पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, सात जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत पवना धरण परिसरात तीन मि़मी़ पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून २२२० मि़मी़ पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने भुशी, वडिवळे, कासारसाई, भामा आसखेड ही धरणे फुल झाली आहेत. लोणावळ्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला. अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. पवना धरणातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांच्यापुढे गेल्याने सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी ही केवळ वीस दिवसांत वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक पाऊस वीस दिवसांत पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. सात जुलैला ३० टक्के असणारे धरणे शंभर टक्क्यांवर पोहोचले आहे. वीस दिवसांत ७० टक्के पाणीसाठा वाढला आहे. २० जुलैपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र धरण परिसरात जोर कायम असल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १००% भरले आहे. त्यामुळे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात शुक्रवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू केला आहे. पवना धरण १००% भरल्याने मावळ परिसरातील शेतकऱ्यांसह पिंपरी-चिंचवड शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी आज अखेर पवना धरण ९८% भरले होते. 

....................धरणातून विसर्ग सुरूपिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरणाचे शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास चार दरवाजा उघडून १५००क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे. तर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ८०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले होते. पंरतु ,परिसरात रात्रभर पावसाची रिमझिम सुरुच राहिल्याने शनिवारी सकाळी पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याची माहिती पवना पाटबंधारे विभागाचे शाखा अभियता ए.एम.गदवाल यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसlonavalaलोणावळा