आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:30 IST2023-09-01T19:28:40+5:302023-09-01T19:30:14+5:30

मुलाचे वडिल हे रागीट स्वभावाचे असल्याने आई वडिलांमध्ये सतत वाद होत असे

Parental disputes lead to divorce The boy worried took extreme steps jumped in front of the train | आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

पिंपरी : आई-वडिलांचे पटत नाही. त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आई-वडिलांमध्ये सतत होणाऱ्या वादाला कंटाळून १५ वर्षीय मुलाने रेल्वे खाली आत्महत्या केली. देव संजयकुमार (वय १५, देहुरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) रात्री घडली. या प्रकरणी देहुरोड रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देहुरोड रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, आई-वडिलांच्या वादातून मुलाने कंटाळून आत्महत्या केली आहे. मुलाच्या आई-वडिलांमध्ये पटत नव्हते. मुलाचे वडिल हे रागीट स्वभावाचे होते. सतत होणाऱ्या वादामुळे मुलाची आई गावी आई मुथुरेला गेली होती. आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत गेल्याने मुलगा चिंतेत होता. त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी मालगाडीच्या चालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या प्रमाणे कारवाई करून पोस्टपार्टम नंतर मुलाचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिला आहे. ते तो घेऊन मथुरा येथे अंत्यसंस्कारासाठी गेले आहेत.

Web Title: Parental disputes lead to divorce The boy worried took extreme steps jumped in front of the train