Pandharpur Wari: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:01 IST2019-06-25T12:59:03+5:302019-06-25T13:01:26+5:30
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते.

Pandharpur Wari: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन
श्री क्षेत्र देहूगाव : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहूगाव येथे करण्यात आले .यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप मधूकर महाराज मोरे,सर्व विश्वस्त तसेच दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्यासह सांप्रदाय व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री पाटील व पार्थ पवार हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित होते.
देहूतून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम गजर करीत दुपारी साडेबारा वाजता देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत दाखल झाला.