अपहरण करून एकास मारहाण :भोसरीत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 13:55 IST2019-01-17T13:54:03+5:302019-01-17T13:55:07+5:30

भोसरीत पाच जणांच्या टोळक्याने आळंदी रस्ता भोसरी येथुन एकाचे अपहरण केले. महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर नेऊन त्यास लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली.

One person assaulted by the kidnapping: Filing a complaint against five people in Bhosari | अपहरण करून एकास मारहाण :भोसरीत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

अपहरण करून एकास मारहाण :भोसरीत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

पिंपरी : भोसरीत पाच जणांच्या टोळक्याने आळंदी रस्ता भोसरी येथुन एकाचे अपहरण केले. महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर नेऊन त्यास लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. बुधवारी या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ दत्तू चव्हाण (वय ४२, रा. भोसरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. रोशन सवडतकर, वैभव ढोरे, ऋतिक रसाळ, प्रज्वल कोलते, सोन्या जगताप अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादींचा मुलगा विरेंद्र यास आरोपी आरोपी प्रज्वल कोलते, त्याचा साथीदार सोन्या जगताप यांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवुन मोकळ्या भुखंडावर नेले. तेथे आमच्या मित्रास का मारले असा जाब विचारत लाथा बुक्यांनी मारहाण सुरू केली. रोशन याने त्याच्याजवळील लाकडी दांडक्याने मारहाण केली. वैभव ढोरे याने लोखंडी कोयत्याने विरेंद्र याच्या पाठीवर, डाव्या हातावर, पोटरीवर, डाव्या पायाच्या मांडीवर वार केले. त्यास गंभीर जखमी केले. या प्रकरणी आरोपीविरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One person assaulted by the kidnapping: Filing a complaint against five people in Bhosari