गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटले एक लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 23:57 IST2018-11-16T23:56:53+5:302018-11-16T23:57:26+5:30

मित्रांबरोबर गप्पा मारत असताना अनोळखी आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने गावठी कट्टा व कोयत्याचा धाक दाखवून १ लाख ३०

One lakh looted robbery in pune threatened by gun | गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटले एक लाख

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटले एक लाख

पिंपरी : मित्रांबरोबर गप्पा मारत असताना अनोळखी आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने गावठी कट्टा व कोयत्याचा धाक दाखवून १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. लूटमारीचा हा प्रकार शुक्रवारी (दि. ५) दुपारी ३.३०च्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील जिजामाता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घडला.

या संदर्भात विश्वनाथ भ. भेगडे (वय ४४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विश्वनाथ भेगडे हे आपले मित्र विनोद भेगडे , बाळासाहेब शेडगे, संतोष भेगडे यांच्याबरोबर येथील पत्र्याच्या शेडमध्ये गप्पा मारत बसले होते. २२ ते २५ वयोगटातील अनोळखी ८ ते ९ जणांच्या टोळक्याने गावठी कट्टा व कोयत्याचा धाक दाखवून १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: One lakh looted robbery in pune threatened by gun