पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:58 IST2018-07-12T13:56:01+5:302018-07-12T13:58:12+5:30
अपघातानंतर कंटेनरचालक पोलीस स्टेशनला स्वत:होऊन हजर झाला असून अद्याप दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही.

पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले
पिंपरी : आयटी पार्क हिंजवडीकडून डांगे चौकाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला मालवाहतुक करणाऱ्या कंटेनरने चिरडले. हा अपघात गुरुवारी ( दि. १२जुलै) दुपारी एकच्या सुमारास मुंबई बंगळूर महामार्गावरील भुमकरवस्ती भुयारी मार्गात झाला. मयत दुचाकीस्वार हे शनी मंदिराकडून येत डांगे चौकाच्या दिशेने जात होता. कंटेनर (एमएच ०६, एक्यू ५९४४) हिंजवडीहुन डांगे चौकाच्या दिशेने जात होता. हे दोनही वाहने भुयारी मार्गात एकत्र आले. तेवढ्यात कंटेनरच्या मागील चाकाखाली दुचाकीस्वार चिरडला गेला. या घटनेनंतर कंटेनरचालक पोलीस स्टेशनला स्वत:होऊन हजर झाला असून अद्याप दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही. हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.