शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लोणावळा शहरात घातक हत्यारांसह एकाला अटक; पुणे ग्रामीण एलसीबीची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:27 PM

लोणावळ्यातील सुरज अगरवाल ह्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व काही बेकायदेशीर हत्यारे आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

लोणावळा: वर्धमान सोसायटी लोणावळा येथील गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथे छापा मारत पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने एका व्यक्तीला दोन गावठी पिस्टल, एक काडतुस, एक लोखंडी कोयता व रेम्बो चाकूसह ताब्यात घेतल्याने लोणावळा शहरात खळबळ माजली आहे.   

पुणे ग्रामीण एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज विजय अगरवाल (वय 40, रा. कल्पतरु हाॅस्पिटल समोर, वर्धमान सोसायटी लोणावळा) असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    पुणे ग्रामीणच्या एलसीबी टिमला गुप्त खबर मिळाली होती की, लोणावळ्यातील सुरज अगरवाल ह्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व काही बेकायदेशीर हत्यारे आहेत. त्या अनुषंगाने सापळा लावत गुरुवारी गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथे सुरज याला ताब्यात घेत अंग झडती घेतली असता त्यांच्या कंबरेला एक पिस्टल व मँग्झिनमध्ये एक जिवंत काडतुस मिळून आले. तसेच त्याच्या गोडऊन मध्ये एका रूमच्या बाहेर चार कप्पे असलेले लोखंडी रॅकची पाहणी केली असता आणखीन एक गावठी कट्टा तसेच कोयता व रेम्बो चाकू मिळून आला असल्याचे घनवट यांनी सांगितले. सदरचे विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेले 2 गावठी पिस्टल  1 जिवंत काडतुस, लोखंडी कोयता, रँबो चाकू असा एकुण 1लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सुनील जावळे, प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, लियाकत मुजावर, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.    अगरवाल याला पुढील तपासणीसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी