अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 19:31 IST2022-12-23T19:29:48+5:302022-12-23T19:31:54+5:30

मुलीला दिघीतील रेणुका शिशू गृहात ठेवण्यात आले असून तिच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे

Oh God! The parents absconded, leaving the one-year-old child on the pavement | अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार

अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार

पिंपरी : अवघ्या एक ते दीड वर्षांच्या मुलीला सुमारास फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुरुवारी (दि.२२) पोलीस नाईक हेमंत महादेव आव्हाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या अज्ञात पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास साई मंदिराच्या विरुद्ध बाजुला दिघी आळंदी सर्व्हिस रोडवर लगत फुटपाथवर वडमुखवाडी येथे एक ते दीड वर्षांच्या मुलीला एकटीला रोडवर तिच्या पालकांनी सोडून दिले. मॉर्निंग वॉकला चाललेल्या व्यक्तीला ही चिमुकली दिसली. तिने तत्काळ पोलिसांना याविषयी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला जवळ घेतले. मुलीला आपले नाव देखील सांगता येत नाही. या मुलीला पोलिसांनी दिघीतील रेणुका शिशू गृहात ठेवण्यात आले असून तिच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Oh God! The parents absconded, leaving the one-year-old child on the pavement