स्वच्छतागृहात महिलांचे शुटींग करणाऱ्या ऑफिसबॉयवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 20:45 IST2019-06-15T20:44:36+5:302019-06-15T20:45:59+5:30
महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल फोन ठेवून चोरून शुटींग करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बाणेर येथील कंपनीत शुक्रवारी (दि. १४) हा प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीतील ऑफिसबॉयवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्वच्छतागृहात महिलांचे शुटींग करणाऱ्या ऑफिसबॉयवर गुन्हा
हिंजवडी : महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल फोन ठेवून चोरून शुटींग करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बाणेर येथील कंपनीत शुक्रवारी (दि. १४) हा प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीतील ऑफिसबॉयवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास अंकुशराव घाडगे (रा. मांधणी, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकणी ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. बाणेर येथे प्रेशंट टेक्नॉलॉजीज कंपनी आहे. या कंपनीच्या वॉशरुममध्ये फिर्यादी महिला शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता फ्रेश होण्यासाठी गेली. त्यावेळी वॉशरुमच्या वरील बाजूस असणाºया पीओपी टाईल्समधील फटीमध्ये फिर्यादी महिलेला मोबाईल फोन ठेवला असल्याचे दिसून आले. वॉशरुममध्ये येणाऱ्या महिलांचे चोरून शुटींग करण्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सदरचा मोबाईल फोन ऑफिसबॉयवर विकास घाडगे याचा असून, तो चोरून शुटींग करताना आढळून आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.