Pimpri - Chinchwad: संतापजनक! कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 19:14 IST2022-01-28T19:14:29+5:302022-01-28T19:14:38+5:30
पीडित कामगार महिलेने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Pimpri - Chinchwad: संतापजनक! कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक
पिंपरी : कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधीत म्हाळुंगे येथील व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत घडला. पोलिसांनी आरोपी असिस्टंट मॅनेजरला अटक केली आहे.
जाक्सन अरुण अल्हाट (वय ३४, रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३० वर्षीय कामगार महिलेने गुरुवारी (दि. २७) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत काम करतात. काम करत असताना आरोपी असिस्टंट मॅनेजर याने त्याच्या पदाचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच त्यांच्याशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. तसेच पीडित कामगार महिलेने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.