कुत्र्यांच्या उपद्रवावर ‘जावईशोध’, घराबाहेर ठेवल्या जातात लाल रंगाच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:04 AM2018-09-27T02:04:23+5:302018-09-27T02:04:54+5:30

मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.

On the nuisance of dogs, red colored bottles is kept out of the house | कुत्र्यांच्या उपद्रवावर ‘जावईशोध’, घराबाहेर ठेवल्या जातात लाल रंगाच्या बाटल्या

कुत्र्यांच्या उपद्रवावर ‘जावईशोध’, घराबाहेर ठेवल्या जातात लाल रंगाच्या बाटल्या

Next

दिघी- परिसरातील मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी दिघीकरांनी तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यावर उपाय म्हणून हतबल झालेल्या नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयास
मिळत आहे. असे केल्याने मोकाट कुत्री फिरकत नसल्याचा ‘जावईशोधा’ला मात्र कुठलाही वैज्ञानिक आधार नसून उलट या रसायन मिश्रित कुंकवाचे पाणी शरीरासाठी अपायकारक असल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे. तर पशुवैद्यकीय अधिकारी यांनीसुद्धा हा दावा खोटा असून, गैरसमजातून नागरिक या प्रकारास बळी पडत असल्याचे स्पष्ट केले आहे.
दिघी परिसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून नागरिक आपल्या घरासमोर कुंकवाचे लाल पाणी प्लॅस्टिक बाटलीमध्ये ठेवत आहेत. हळूहळू याची चर्चा होत हा प्रकार दिघी परिसरात वाढत गेला. आदर्शनगर, शिवनगरी व अन्य भागात याचे लोण पसरून सगळीकडे रस्त्याच्या कडेला लाल रंगाच्या बाटल्या दिसू लागल्या. याविषयी नागरिकांना विचारणा केली
असता शेजाऱ्यांनी ठेवली म्हणून आम्हीसुद्धा ठेवली असल्याचे सांगितले. तर महिला वर्गांनी यामुळे खूप फरक जाणवत असून, मोकाट कुत्री परिसरात फिरकतसुद्धा नसल्याचे सांगितले.
मात्र याला आधार काय असे विचारले असता लाल रंगाला कुत्री घाबरत असल्याचे सांगितले. लाल रंगाने कुत्री येत नसल्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न प्रत्येक नागरिकांना विचारला तेव्हा कुणी यू ट्युब वर बघितले, टीव्हीवर दाखविले, आमच्या गावाकडे पण करतात, अशी ढोबळ उत्तरे मिळाली.

अंधश्रद्धा : शैक्षणिक संस्थेच्या आवारात शिरकाव

दिघी परिसरात चर्चेचा विषय ठरू पहाणाºया या प्रकारामुळे अशिक्षित किंवा कमी शिकलेले नागरिक अनुकरण करतात़ हे ऐकवेळ मान्य होईल मात्र शैक्षणिक संस्थांमधून ज्ञानदानाचे कार्य करीत विज्ञानाचा पुरस्कार करणारे या विळख्यात सापडले असल्याचे वास्तव आहे. परिसरातील उच्च शिक्षित तसेच शैक्षणिक संस्था यांच्या आवारात लाल रंगाच्या बाटलीचा प्रयोग केल्याचे दिसून येते. यावरून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास सोडून अंधश्रद्धेच्या खाईत ढकलण्याचा हा प्रताप म्हटला तर वावगे ठरू नये.

वैज्ञानिक आधार नसून फक्त मानसिक समाधान
दिघीत झालेला हा प्रकार या आधी महाराष्ट्रातील अनेक भागांत झाला आहे. तेव्हासुद्धा प्राणी मित्रांनी याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसून खोटा समज पसरविला आहे. सर्व कुत्रे याला घाबरतात असे नाही. भटक्या कुत्र्यांचा वावर एका ठिकाणी कधी नसतो. दोन चार दिवस घाण झाली नाही म्हणून फरक पडला असे अजिबात नसून, मानसिक समाधान आहे. काही ठिकाणी तर लाल रंगाच्या बाटलीच्या जवळ कुत्र्यांनी घाण केल्याचे आढळून आले आहे.
- विक्रम भोसले, प्राणी मित्र

कुठलेही तथ्य नसून नागरिकांनी विश्वास ठेवू नये
लाल रंगाला घाबरून मोकाट कुत्री येत नसल्याच्या दाव्यात कुठलेही तथ्य नाही़ गैरसमज व प्राण्याविषयी असलेली अपूर्ण माहिती यामुळे नागरिक या प्रकारास बळी पडत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारावर विश्वास ठेवू नये. उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्ताची योग्य ती कारवाई प्रशासनाकडून केली जाते.
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी

कुत्र्यांचा उपद्रव
दिघी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. उपद्रवी ठरणाºया कुत्र्यांची संख्या जास्त आहे. प्रशासनाला तक्रार करूनही निवारण होत नाही. नावापुरती कारवाई करून नंतर लक्ष दिले जात नाही. रात्री बेरात्री परिसरात कुत्र्यांचा हैदोस असतो. ठिकठिकाणी घाण केलेली, गाडीची सीट कुरतडणे, चपला पळवणे, लहान मुलांच्या व वाहनचालकांच्या मागे लागणे, अशा घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून, संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी.
- विनायक प्रभू,
स्थानिक नागरिक, आदर्शनगर

Web Title: On the nuisance of dogs, red colored bottles is kept out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.