शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाइल चोऱ्या रोखण्यासाठी पथक

By admin | Updated: June 19, 2016 04:37 IST

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रस्त्याने मोबाइल फोनवर बोलत चालणाऱ्या व्यक्तीचे पाठीमागून मोटार सायकलीवरून येऊन मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढले. यासाठी युनिट चारने पथक तयार

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रस्त्याने मोबाइल फोनवर बोलत चालणाऱ्या व्यक्तीचे पाठीमागून मोटार सायकलीवरून येऊन मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढले. यासाठी युनिट चारने पथक तयार केले. अनेक दिवसांपासून हे पथक आरोपींच्या शोधावर होते. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांनी विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मोदीन महंमद शेख ( वय १९, रा. चिंचवडेनगर), आफताब अल्ताफ पिरजादे ( वय २०, रा. बिजलीनगर) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी मोबाइल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तपासामध्ये ४० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे चार मोबाइल जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालाबाबत निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. शेख व पिरजादे हे दोन्ही आरोपी निगडी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मोबाइल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. एक महिन्यापूर्वी या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्यांच्याकडून मोटार सायकल, दोन महागडे मोबाइल असा ७६ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला होता. (वार्ताहर)