शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची पिंपरी महापालिकेला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 3:22 PM

महापालिकेचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश सक्षम प्राधिकरणास का देण्यात येऊ नये..

ठळक मुद्दे४७ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी पवना, मुळा  आणि सोडले जाते इंद्रायणी नदीत नदीतील मासे मरण्याचे प्रकार वषार्तून दोनदा झाल्याचे निदर्शनास जलचर प्राण्यांची जीवितहानी पाहता पर्यावरणास हानी

पिंपरी : महापालिकेच्या बेपर्वाईमुळे नदीचे पर्यावरण बिघडत आहे. महापालिकेने विनाप्रक्रीया सांडपाणी नदीत सोडणे तातडीने थांबवावे, सांडपाणी प्रक्रियेबाबत कृती आराखडा सादर करावा, महापालिकेचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश सक्षम प्राधिकरणास का देण्यात येऊ नये, असे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.पवनेतील प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाला होता. याबाबत 'लोकमत' ने प्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत माजी खासदार गजानन बाबर यांनीही महामंडळास पत्रव्यवहार केला होता. गेल्या महिन्यात थेरगाव केजूबाई बंधारा येथे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची तक्रार राहुल सरोदे यांनी केल्यावर एमपीसीबी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ताथवडे स्मशानभुमीजवळील नदीपात्रात कासव मृतावस्थेत आढळले. नदीत चार ठिकाणांहून विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी  मिसळत असल्याचे आढळून आले.सांडपाण्यावर प्रक्रियेकडे दुर्लक्ष  महापालिका सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करत नसल्याने नदीतील मासे मरण्याचे प्रकार वषार्तून दोनदा झाल्याचे निदर्शनास आले. रावेत मैलाशुद्धीकरण केंद्राची अवस्था दयनीय झाली आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी गढूळ, हिरवट रंगाचे आढळले. या सर्व तपशीलांचा, निरीक्षणांचा विचार करता महामंडळाने महापालिकेला नोटीस दिली होती. महापालिकेने नियमांचे उल्लंघन केले आहे. जलचर प्राण्यांची जीवितहानी पाहता पर्यावरणास हानी पोहोचवली आहे. असा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. वीज मंडळाला आदेश देऊन वीजपुरवठा तर पाटबंधारे विभागाला आदेश देऊन पाणीपुरठा खंडीत करण्यास का बजावू नये ?, महापालिकेच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करू नये, अशी थेट विचारणा केली आहे. महापालिकेने विनाप्रक्रीया केलेले पाणी पवना नदीत सोडणे तातडीने थांबवावे. नदीप्रदुषण रोखण्याबाबतचा कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे आदेशही महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.   गजानन बाबर म्हणाले,महापालिका पवना नदीतून दररोज ५२० एमएलडी पाणी उचलते. तर, केवळ ३१२ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रीया करते. ४७ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी पवना, मुळा  आणि इंद्रायणी नदीत सोडले जाते. पुरेशी सांडपाणी वाहू नलिका आणि मैलाशुद्धीकरण केंद्रांच्या अभावामुळे दुषित पाणी नद्यांमध्ये मिसळत आहे. नद्यांचे मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदुषण झाले आहे. जलपर्णी वाढली आहे.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण