' पीएमपी' च्या ताफ्यातील मिडी बसला सोसेना प्रवाशांचा भार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:00 PM2019-12-12T23:00:00+5:302019-12-13T13:35:56+5:30

‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये दोन वर्षांपुर्वी २०० मिडी बस दाखल...

No loads took by Midi bus of passengers | ' पीएमपी' च्या ताफ्यातील मिडी बसला सोसेना प्रवाशांचा भार

' पीएमपी' च्या ताफ्यातील मिडी बसला सोसेना प्रवाशांचा भार

Next
ठळक मुद्देमिडी बसच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याने याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार 'एआरएआय' करणार मिडी बस ची तपासणीबसच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

पुणे : जेमतेम दोन वर्षांच्या कालावधीतच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यातील मिडी बसला प्रवाशांचा भार सोसवेनासा झाला आहे. सुमारे २०० बसपैकी ५० हून अधिक बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. लांबपल्याच्या फेऱ्या तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्येमुळे या बस नादुरूस्त होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. 
‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये दोन वर्षांपुर्वी २०० मिडी बस दाखल झाल्या. या बस शहरांतर्गत छोट्या रस्त्यांवरील मार्गांवर सोडण्यात येतील, असे सुरूवातीला अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. पण त्यावेळी ताफ्यातील एकुण बसची संख्या अपुरी असल्याने या बस लांबपल्याच्या, गर्दीच्या मार्गावर सोडण्यास सुरूवात झाली. बसची आसन क्षमता केवळ ३२ एवढी आहे. पण अनेकदा या बसमधून ७० ते ७५ प्रवासी प्रवास करतात. पण काही महिन्यांतच बस मार्गातच बंद पडण्यास सुरूवात झाली. साधारणपणे दीड वर्षातच काही बसच्या इंजिनमध्ये बिघाड होऊ लागला. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी बसच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली. अजूनही इंजिनमधील दोष सातत्याने पुढे येत आहेत. आतापर्यंत ३० ते ३५ बसचे इंजिन बदलण्यात आले आहे. सध्या २० ते २५ बसच्या इंजिनची कामे सुरू असल्याने त्या बंद आहेत. तसेच दररोज काही बसचे ब्रेकडाऊनही होत आहे. 
पिंपरी आगारात बुधवारी (दि. १२) मिडी बसच्या इंजिनमध्ये स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाले. यापुर्वी दोन-तीन वेळा अशा घटना घडल्याचे कर्मचारी सांगतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतुकीसाठी आवश्यक क्षमती मिडी बसमध्ये नाही. काही दिवसांतच ते समोर आले. बसच्या आसन क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक प्रवासी प्रवासी करत आहेत. काही बसला लांबपल्याचे मार्ग देण्यात आले. कात्रज आगारातून सासवडसाठी सोडण्यात येणाºया बस तीव्र चढाच्या बोपदेव घाटातून जातात. प्रवाशांनी भरून वाहणाऱ्या बसला हा तीव्र चढ चढणे अत्यंत जिकीरीचे आहे. यापुर्वी काही बस घाटातच बंद पडल्या आहेत. काही मार्ग बंद करण्याबाबत वाहतुक व्यवस्थापकांना सांगण्यातही आले आहे. बसमध्ये सातत्याने होत असलेले बिघाड चिंताजनक आहेत. कंपनीने बससाठी दोन वर्षांची वॉरंटी दिली होती. काही बसचा वॉरंटीचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे या बसच्या दुरूस्तीचे काम पीएमपीलाच करावे लागत आहे. तर वॉरंटीमध्ये असलेल्या बसचे इंजिन कंपनीकडून बदलून दिले जात आहे. 
---------------
'एआरएआय' करणार मिडी बस ची तपासणी
मिडी बस मधील बिघाडाने त्रस्त झालेल्या पीएमपी प्रशासनाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) कडून बस ची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मिडी बस तातडीने संस्थेत पाठवली जाणार आहे. बसची सर्वप्रकारे तांत्रिक तपासणी केली जाईल. पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, पिंपरी आगारात बुधवारी मिडी बस च्या इंजिनचा स्फोट झालेला नाही. अचानक इंजिन रेस झाल्याने गियर बॉक्सचे आवरण, क्लच प्लेट तुटली. त्याचा आवाज होऊन तुकडे तीन कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाले, असा खुलासा प्रशासनाने दिला आहे.
.......
कंपनीशी पत्रव्यवहार
मिडी बसच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याने याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्व तांत्रिक दोष कंपनीकडून दुरूस्त करून दिले जात आहेत. ही कंपनीची जबाबदारी आहेत. - अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: No loads took by Midi bus of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.