बावधन येथे एका रात्रीत नऊ घरफोड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:07 IST2018-10-15T13:04:52+5:302018-10-15T13:07:03+5:30
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन परिसरात रविवारी रात्री नऊ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

बावधन येथे एका रात्रीत नऊ घरफोड्या
पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन परिसरात रविवारी रात्री नऊ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दागिने,रोख रक्कम असा लाखाे रुपयांचा ऐवज चोरोस गेला आहे.
बावधन येथील प्रेक्षा सोसायटी, रॉयल ट्विन्स सोसायटी, गुलमोहर सोसायटी, पदमश्री सोसायटी या ठिकाणी सदनिका फोडण्यात आल्या. प्रेक्षा सोसाटीत अमिका बर्डे यांच्या घरातून 33 हजाराची रोकड चोरट्यांनी पळवली. तसेच अमेया सापटनीकर, संजय पाटील,अशोक पाठक यांनी घरफोडीच्या बाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
रॉयल सोसायटीत निलेश फळ, जॉन थॉमस, गुलमोहर सोसायटीत निलेश देशपांडे,करणं बविशी, अनिरुद्ध म्हसे याच्या घरी चोरी झाली आहे. पदमश्री कॅलस्सीकमध्ये अंकुर ओझा याची सदनिका चोरट्याने फोडली, त्याचबरोबर शिंदेनगरमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.