पिंपरीत राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कोरोना नियमांना तुडवले पायदळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:11 IST2021-09-01T12:36:57+5:302021-09-01T13:11:00+5:30
महापालिकेत भाजपची सत्ता असून ते शहरातील असंख्य प्रश्न सोडवण्यास असफल ठरत असल्याचा आरोप त्यांनी आंदोलनातून केला आहे

पिंपरीत राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कोरोना नियमांना तुडवले पायदळी
पिंपरी : 'धरा दाम पण करा काम' अशा घोषणा देत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने भाजप विरोधात आंदोलन करण्यात आले. महापालिकेत भाजपची सत्ता असून ते शहरातील असंख्य प्रश्न सोडवण्यास असफल ठरत असल्याचा आरोप त्यांनी आंदोलनातून केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हातगाडीवर पैशाचे बंडल ठेवून आंदोलनाला सुरुवात केली. मात्र राज्याचे मुख्यमंत्री वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगत असूनही राजकीय कार्यकर्ते नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र आंदोलनातून दिसून आलंय.
आंदोलनात कार्यकर्त्यांबरोबरच महिलाही सहभागी झाल्या होत्या. पण त्यांनी रस्त्यावर गर्दी करण्याबरोबरच विनामास्क फिरतानाचे चित्र दिसून आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. पण शहरातील पाणी, रस्ता, असे नागरी प्रश्न सोडवण्यास महापालिका असफल ठरत आहे. तसेच त्यांना शहराच्या विकासासाठी पैसे कमी पडत असतील. तर राष्ट्रवादी ते द्यायला तयार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे.
'धरा दाम पण करा काम' अशा घोषणा देत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने भाजप विरोधात आंदोलन pic.twitter.com/5mOqRIqqdi
— Lokmat (@MiLOKMAT) September 1, 2021
आंदोलनकर्त्यांच्या गर्दीमुळे झाली वाहतूककोंडी
पिंपरीत रस्त्याच्या मधोमध चालत राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे. कोरोना नियमांना पायदळी तुडवत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध हे चालत असल्याचे वाहतूक कोंडी झाल्याचे चित्रही दिसून आले आहे. सण, उत्सवावर निर्बंध घातले जात असताना आंदोलनाला कशी काय परवानगी मिळते, असा सवाल स्थानिक नागरिकांनी यावेळी उपस्थित केलाय.