शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी

By नारायण बडगुजर | Updated: June 4, 2025 23:35 IST

सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली

नारायण बडगुजर

पिंपरी : माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या २१व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये ३१ मे रोजी ही घटना घडली. 

अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५, रा. हिंजवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. ३१ मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीमध्ये दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या २१ व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.  

बाथरुमच्या भिंतीवर रक्ताचे डाग

अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला. अभिलाषा रात्री एक वाजतापर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसून आली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु त्याबाबत लक्षात आले नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करीत होते. परंतु तिचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. 

नॅपकीन, मोबाइल जप्त

पोलिसांनी घरात पाहणी केली असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली. ‘माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वत:च्या मर्जीने करत आहे’ असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी