भांडणाच्या कारणावरून चौघांवर खुनी हल्ला; देहूरोड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:12 IST2022-04-26T15:10:36+5:302022-04-26T15:12:38+5:30

सहा जणांना अटक...

murderous attack on four due to quarrel incident at dehuroad pune latest crime | भांडणाच्या कारणावरून चौघांवर खुनी हल्ला; देहूरोड येथील घटना

भांडणाच्या कारणावरून चौघांवर खुनी हल्ला; देहूरोड येथील घटना

पिंपरी : भांडणाच्या कारणावरून चौघांवर खुनी हल्ला केला. याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील सहा जणांना अटक केली. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री पारशी चाळ, देहूरोड येथे घडली. 

वीर शाम डुलगज (वय १८, रा. पारशीचाळ, देहूरोड), त्यांचे चुलते संदीप डुलगज, आत्या दीपा भिगानिया, आजोबा रामकिशन डुलगज अशी जखमींची नावे आहेत. वीर डुलगज यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २५) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनिल रोहिदास टाक (वय ३३), सुनील उर्फ गुगा रोहिदास टाक (वय ३१), हरीश रोहिदास टाक (वय ३०), तीन महिला आणि अन्य दोघेजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अनिल टाक याने पालघनने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी यांचे चुलते, आत्या आणि आजोबा यांच्यावर देखील पालघन, हॉकी स्टिक, तलवार, सत्तूर, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: murderous attack on four due to quarrel incident at dehuroad pune latest crime