दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; आरोपी चोवीस तासात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:40 IST2023-01-05T18:39:50+5:302023-01-05T18:40:13+5:30

वादातून आणि जुन्या रागातून आरोपीने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली

Murder of a friend due to an argument over drinking Accused imprisoned within 24 hours | दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; आरोपी चोवीस तासात जेरबंद

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; आरोपी चोवीस तासात जेरबंद

पिंपरी : डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून ३८ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. या घटनेच्या अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी आरोपी अटक केली. ही घटना घटना मंगळवारी (दि.३) रात्री नऊ ते बुधवारी (दि.४) सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पूर्ववैमन्स्यातून दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव राजेश शिवलिंग जाधव (वय ३८, रा.चिंचवड) असे आहे. तर, अटक केलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ सुभाष बडदाळे (वय ४०) असे आहे. या प्रकरणी विकास प्रकाश जाधव (वय ३६, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भाड्याने दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राजेश जाधव राहत होता. त्याचे आणि आरोपी सोमनाथ यांची मैत्री होती. राजेश एकटे राहत असल्याने सोमनाथ त्याच्याकडे कधी कधी येत होता. एकदा दोघांमध्ये झालेल्या वादातून राजेश याने सोमनाथ याला मारहाण केली होती. त्याचा राग सोमनाथच्या मनात होता. पुन्हा दारू पित असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून आणि जुन्या रागातून सोमनाथ याने राजेश याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली. रावेत पोलीस ठाण्याच्या पोलीस तपास पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केली.

Web Title: Murder of a friend due to an argument over drinking Accused imprisoned within 24 hours