शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल खराब होण्याची भीती; नुकसानीची भरपाई कोण करणार? शेतकऱ्यांना कोंडीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:46 IST

वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

लोणावळा :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातामध्ये गॅस गळती झाली. गेल्या २४ तासांपासून वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा होत्या.  हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत. हजारो वाहन प्रवासी तासनतास वाहतूक बंद असलेल्या कार, बसमध्येच अडकले होते. कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले होते.

वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काहींना विमानतळावर पोहोचायचे आहे, तर काहींना दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी पोहोचायचे आहे, तर काहींना शेतीमाल मुंबई आणि विमानतळावर पोचवायचा होता. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

पर्यायी मार्गांचा वापर, आर्थिक नुकसानस्थानिक प्रशासन आणि राज्य महामार्ग पोलिसांनी पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ताम्हिणी आणि माळशेज मार्ग नेण्याचे आवाहन केले होते. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेस-वे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी पुणे, पौड ताम्हिणी घाट, माणगाव मार्गे मुंबईला गेले. तर काहीजण माळशेज घाट मार्गचा वापर केला. पुणे-चाकण-नारायणगाव-माळशेज घाट-कल्याणमार्गे ठाणे गाठले. त्यामुळे प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढल्याचे वाहनचालकांनी सांगतिले. तसेच बचाव आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इंधन, गॅसतज्ज्ञ पथक तैनात होते. गॅस समस्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. 

पहाटेपासून आम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकलो असून, आमच्याबरोबर लहान-लहान मुले आहेत. पाणी पिण्यासाठी आणि वॉशरूमसाठी आमचे प्रचंड हाल झाले असून, लोणावळा शहरातील पोलिस बांधवांनी आम्हाला पाणी आणि वडापावची सोय करून दिली; परंतु आमच्या लहान मुलांची खाण्याची सोय झाली नाही. - महिला प्रवासी 

पहाटे चार वाजल्यापासून आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलो असून, प्रचंड हाल सहन करावे लागले आहेत; परंतु काही पोलिसांनी येऊन आम्हाला पाण्याची आणि खाण्याची सोय करून दिली. काही फेरीवाल्यांना या ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून आम्हाला आइस्क्रीम वगैरेंची सोय करून दिली. त्याबद्दल आम्ही पोलिसांचे खूप खूप आभारी आहोत. - कर्नाटक राज्यातून आलेले प्रवासी

रात्री नऊ वाजल्यापासून आमची वाहने या ठिकाणी उभे आहेत. या सर्व वाहनांमध्ये शेतीमाल घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने चाललो आहे. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, उन्हामुळे हा माल खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होणार असून या झालेल्या नुकसानीची भरपाई आम्ही कशी करायची? या ठिकाणी आमची खाण्यापिण्याची कसलीही नाही आणि या भरलेल्या मालाची वाहने सोडूनही आम्हाला जाता येत नाही. आमच्या शेतीमालाचा विचार करून शासनाने याची दखल घ्यावी. - शेतकरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Traffic halts, crops rot: Who compensates farmers' losses?

Web Summary : Gas leak on the Mumbai-Pune Expressway caused massive traffic jams. Farmers fear crop spoilage due to delays. Passengers faced hardship without adequate food and water. Alternative routes added hours to journeys, prompting calls for government compensation for agricultural losses.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातMumbaiमुंबईlonavalaलोणावळाMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे