युनिट हेडकडून महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 15:00 IST2019-08-25T14:58:54+5:302019-08-25T15:00:19+5:30
एका कंपनीतील युनिट हेडने महिलेचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी भागात घडली आहे.

युनिट हेडकडून महिलेचा विनयभंग
पिंपरी : तू खूप दिवस सुट्टी घेतली, असे म्हणून महिलेशी अश्लिल बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. सूस, पुणे येथे एका कंपनीच्या कार्यालयात युनिट हेड असलेल्या आरोपीकडून दि. १९ ऑगस्ट रोजी विनयभंगाचा हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गुळवणी असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी सूस येथील कंपनीत युनीट हेड आहे. ‘‘तू खूप दिवस सुट्टी घेतली,’’ असे बोलून आरोपी गुळवणी याने ब्रीफींग मिटींगमध्ये सर्व स्टाफसमोर फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच सायंकाळी फिर्यादी महिला आरोपी गुळवणी यांच्या समोर उभी असताना आरोपीने त्यांच्याकडे एकटक बघून अश्लिल बोलून विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.