घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलीचा बचावासाठी आरोपीवर चाकूने हल्ला

By रोशन मोरे | Updated: August 30, 2022 15:22 IST2022-08-30T15:22:30+5:302022-08-30T15:22:37+5:30

आरोपी विधीसंघर्षीत बालकाविरोधात गुन्हा दाखल

molestation of a minor girl by breaking into the house Accused attacked with a knife to protect the girl | घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलीचा बचावासाठी आरोपीवर चाकूने हल्ला

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलीचा बचावासाठी आरोपीवर चाकूने हल्ला

पिंपरी : घरात घुसून एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केला. मुलीने आपल्या बचावासाठी आरोपीवर चाकूने हल्ला केला. यामुळे शेजारील लोक जमले. त्यावेळी आरोपीने मुलीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत घरातून निघून गेला. या प्रकरणी मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी विधीसंघर्षीत बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरात एकट्या असल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला. त्याने फिर्यादीचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने त्याचा प्रतिकार केला असता आरोपीने मारहाण करण्यास सुरवात केली. फिर्यादीने घरातील भाजी कापण्याच्या चाकुने आरोपीला मारले. त्यावेळी आजुबाजुचे लोक जमले. त्यांनी दिलेल्या आवाजाने आरोपी फिर्यादीला शिवीगाळी करत जीवे मारण्याची धमक देत निघून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: molestation of a minor girl by breaking into the house Accused attacked with a knife to protect the girl