विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 15:09 IST2019-01-13T15:08:56+5:302019-01-13T15:09:58+5:30

विवाहित महिलेचा विनयभंग करीत विवाहितेच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Molestation of married women | विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ

विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ

पिंपरी : विवाहित महिलेचा विनयभंग करीत विवाहितेच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विकास अशोक तौर (वय २५, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी अनेक दिवसांपासून फिर्यादी महिलेला त्रास देत होता. शुक्रवारीदेखील आरोपीने या महिलेला त्रास दिला. ‘तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्याशी लग्न करशील का’ असे म्हणत त्या महिलेचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी भोसरीतील भारत माता चौक येथे घडली. तसेच फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ, मारहाण करीत दमदाटी केली. याप्रकरणी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहायक निरिक्षक बाळासाहेब शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Molestation of married women