Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:40 IST2024-10-25T14:40:20+5:302024-10-25T14:40:38+5:30
आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान
पिंपरी : मोबाइल शॉपीला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पिंपरीतील शगुन चौकात असलेल्या प्रीतम मोबाइल या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालयातून आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
दुकानाचे शटर उचकटून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दलाचे चंद्रशेखर घुले, फायरमन सारंग मंगरुळकर, रुपेश जाधव, चालक केतन औसरमल, ट्रेनी फायरमन स्वप्नील उचाले, राज शेडगे, किरण राठोड, अनिकेत गोडसे, कौस्तुभ जाधव, आविष्कार लावंड, रतन जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.