निलंबित पोलिसावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; दिघीत नऊ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:50 PM2021-07-28T14:50:28+5:302021-07-28T14:52:40+5:30

सोनके हे पुणे शहरातील चंदन नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून ते सध्या निलंबित आहेत.

Mob assault on suspended police; A case has been registered against nine persons in Dighi | निलंबित पोलिसावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; दिघीत नऊ जणांवर गुन्हा दाखल

निलंबित पोलिसावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; दिघीत नऊ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : टोळक्याने निलंबित पोलिसावर हल्ला केला. दगड मारून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दिघी येथे मंगळवारी (दि. २७) रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. 

परमेश्वर तुकाराम सोनके (वय ४१, रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनिकेत हेमराज वाणी (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), सुरज खिलारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल आघाम, राहुल जाधव व इतर दोन अनोळखी साथीदार, असे नऊ जणांच्या विरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनके हे पुणे शहरातील चंदन नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून ते सध्या निलंबित आहेत. मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी ममता चौक येथून ते जात होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी थांबून आरोपी आरडाओरडा करत होते. फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगितले व तेथून जाण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी हे दिघी जकात नाका जवळ गेले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. 

फिर्यादी हे दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांनी आरोपी अनिकेत वाणी याला यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्याचा राग मनात ठेवून फिर्यादीला दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सोनके हे गंभीर जखमी झाले. तसेच दगड मारून गाडीचेही नुकसान केले. तुला संपवूनच टाकतो, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजवत त्यांच्या दुचाकीवरून निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे तपास करीत आहेत.

Web Title: Mob assault on suspended police; A case has been registered against nine persons in Dighi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.