शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

हौसेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:44 PM

दोन लाख ४५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त

ठळक मुद्देपिंपरी पोलिसांनी सापळा रचून घेतले एका अल्पवयीन मुलाला ताब्यात

पिंपरी : हौसेखातर दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन लाख ४५ हजारांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर, चिंचवड येथून १० दिवसांपूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा पिंपरी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. टेल्को रोड, चिंचवड येथे एक मुलगा लाल काळ्या रंगाच्या दुचाकीवर आला आहे. त्या दुचाकीला क्रमांक नसून ती चोरीची आहे, अशी माहिती पिंपरी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अनिल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने १० दिवसांपूर्वी मोहननगर, चिंचवड येथून चोरल्याचे सांगितले. तसेच आणखी चार दुचाकी चोरल्याचे देखील त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ४५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, पिंपरी, देहूरोड आणि हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस कर्मचारी अनिल गायकवाड, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, जावेद बागसिराज, श्रीकांत जाधव, प्रतिभा मुळे, शहाजी धायगुडे, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर, रमेश दोरताले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक