शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत ९७ मंडळांचा गणरायाला निरोप

By admin | Updated: September 17, 2016 00:45 IST

ढोल-ताशांचा दणदणाट, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत, भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून पिंपरीत गणरायाला निरोप दिला

पिंपरी : ढोल-ताशांचा दणदणाट, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत, भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून पिंपरीत गणरायाला निरोप दिला. सुमारे अकरा तास मिरवणूक सुरू होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ जयघोषाने आसमंत दणाणला. एकूण ९७ मंडळांनी गणरायाला निरोप दिला. फुलांची मोहक आरास, वारकऱ्यांचे पथक, गणेशभक्तांना अन्नदान असे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते.पिंपरीतील शगून चौक येथे महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी व्यवस्था केली होती. शगून चौकमार्गे लिंक रस्त्याने मंडळे विसर्जन घाटावर जात होती. दुपारी पावणेएकला जी. के. एन. सेंटर मेटल प्रायव्हेट लिमिटेडचा पहिला गणपती चौकात आला. महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर वरुण पार्क सोसायटी व झुलेलाल तरुण मंडळ विसर्जन घाटाकडे रवाना झाले. गणेश मंडळांनी डीजेएवजी ढोल-ताशा या पारंपरिक वाद्याला अधिक प्राधान्य दिले होते. मावळ, मुळशी आणि खेड या तालुक्यांतील ढोल-ताशा आणि झांज पथके लक्षवेधी ठरली. गुलालविरहित मिरवणूक हे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्याऐवजी फुले आणि भंडाऱ्याची उधळण भक्तांनी केली. दुपारी दोन ते सायंकाळी पाच या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित करीत होत्या. मिरवणूक पाहण्यासाठी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पिंपरीत सायंकाळी काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, क्षणार्धात पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाला. गणेश मंडळांनी अतिशय सुंदर पद्धतीने रथांची सजावट केली होती. डी वॉर्ड फ्रेंड्स सर्कल मंडळाने तिरुपती बालाजीची भव्य प्रतिकृती केली होती. तर नेहरुनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाने दर वर्षीप्रमाणे जनजागृती करून मंडळाचे वेगळेपण जपले होते. त्यांनी व्यसनमुक्तीसंदर्भात संदेश देणारे फलक घेऊन गणेशभक्त प्रबोधन करीत होते. रात्री आठनंतर मिरवणुकीतील जोश वाढला. रात्री दहानंतर ढोल-ताशांचा दणदणाटाने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. रात्री बाराला पारंपरिक वाद्यांचा दणदणाट थांबला. त्यानंतर मंडळांनी शांततेत गणरायाला निरोप दिला. मध्यरात्री साडेबारापर्यंत मंडळांच्या वतीने विसर्जन करण्यात येत होते. (प्रतिनिधी)