शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 6:43 PM

व्यसनाधिन भाऊ सातत्याने दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने मतीमंद अाराेपीने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घातल्याने त्याच्या भावाचा मृत्यू झाला.

निगडी : ओटास्किम पेठ क्रमांक २२ येथील मिलिंदनगर येथे राहणाऱ्या दोघा भावांची रविवारी सकाळी ८ च्या सुमारास किरकोळ कारणावरून हमरातुमरी झाली. रागाच्या भरात एकाने सिमेंटचा गट्टू उचलुन दुसऱ्याच्या डोक्यात घातला. गंभीर जखमी झाल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम गुरप्पा शिंगे (वय २५) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर सुरेश गुरप्पा शिंगे असे आरोपीचे नाव आहे. 

    दोन सख्या भावांवर अज्ञात आरोपींनी रविवारी सकाळी ८ च्या सुमारास हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ जखमी झाला. असे वृत्त सर्वत्र पसरले. या घटनेत तुकाराम शिंगे याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सुरेश हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. निगडी पोलिसांच्या पथकाने सुरेश यांच्याकडे घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून योग्य उत्तरे मिळत नव्हती. त्याच्याबद्दल पोलिसांनी परिसरातील लोकांकडे विचारपुस केली असता, तो मतीमंद असल्याचे समजले. मतीमंद असल्याने घडलेल्या घटनेची तो विसंगत उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सुरेशकडून योग्य प्रकारे माहिती मिळत नव्हती. अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची माहिती दिली. भाऊ तुकाराम हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने माझ्याशी वाद घातला. दोघेही हमरीतुमरीवर आल्यानंतर झटापट झाली. घराच्या दारात पडलेला सिमेंट गट्ट उचलून तुकारामला मारला. डोक्याला मार लागल्याने तुकाराम जागीच कोसळला. अशी कबुली सुरेशने दिली. निगडी पोलिसांच्या पथकाने अवघ्या सहा तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

एक व्यसनाधिन, दुसरा मतीमंद ओटास्किम येथे राहणारे शिंगे कुटुंबिय मुळचे कर्नाटकचे, अनेक वर्षापासून आई आणि तिघे भाऊ येथे वास्तव्यास आहेत. तुकाराम व्यसनाधिन तर सुरेश मतीमंद आणि मोठा भाऊ बिगारी काम करणारा असे तीन भाऊ. त्यातील तुकाराम, सुरेश हाताबाहेर गेलेले. तुकाराम रोजंदारी करीत तर सुरेश भिक मागत असे. त्यांच्यात नेहमीच खटके उडत. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात त्यांच्यातील एका भावाचा जीव गेला.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनnigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारी