विवाहितेला काढायला लावल्या १५० उठाबाश्या; बेल्टने मारहाण, पतीसह दीरावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 16:14 IST2023-05-10T16:14:08+5:302023-05-10T16:14:16+5:30

लग्न झाल्यापासून विवाहितेसोबाबत वाद घालून तिला लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारत होते

married women a case was filed against her husband for beating her with a belt | विवाहितेला काढायला लावल्या १५० उठाबाश्या; बेल्टने मारहाण, पतीसह दीरावर गुन्हा दाखल

विवाहितेला काढायला लावल्या १५० उठाबाश्या; बेल्टने मारहाण, पतीसह दीरावर गुन्हा दाखल

पिंपरी : विवाहित महिलेचा सासरी छळ करण्यात आला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला लग्ना झाल्यापासून तिला बेल्टने मारहाण करण्यात आली. तसेच दिराने घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या. या छळात पतीने देखील साथ दिली. ही घटना २६ डिसेंबर २०२१ ते मंगळवारी (दि.९) या कालावधीत आदर्शनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह, दीर आणि दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे लग्न झाल्यापासून आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घालून तिला लाथाबुक्क्या तसेच कमरेच्या बेल्टने मारले. तसेच आरोपींनी फिर्यादीचा गळा दाबून दिला जीवे मारण्याचे देखील प्रयत्न केला. फिर्यादीला मानसिक तसेच शारिरीक त्रास देत आरोपी दिराने जबरदस्तीने घरात १५० उठाबशा काढायला लावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: married women a case was filed against her husband for beating her with a belt