marijuana man raped on women by showing marriage promise | गांजाच्या नशेत महिलेवर अत्याचार
गांजाच्या नशेत महिलेवर अत्याचार

पिंपरी : मेट्रोमनी वेबसाईटवरून ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून भेटायला बोलावले. त्यानंतर हॉटेलवर नेऊन गांजाच्या नशेत तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. लोणावळा येथे २ सप्टेंबर २०१९ रोजी ही घटना घडली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवीन दत्तात्रय गावडे (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी यांची मेट्रोमनी वेबसाईटवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी नवीन याने फिर्यादी महिलेस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी भेटण्यासाठी बोलविले. तसेच २ सप्टेंबर रोजी आरोपीने फिर्यादी महिलेला लोणावळा येथे फिरायला जाण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार फिर्यादी महिला आणि आरोपी लोणावळा येथे फिरायाला गेले. लोणावळ्यामध्ये आरोपीने गांजाचे व्यसन केले. गांजाच्या नशेत आरोपीने फिर्यादी महिलेला एका हॉटेलमधील रूमवर नेले. तेथे फिर्यादीवर अत्याचार केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: marijuana man raped on women by showing marriage promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.