शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

Maharashtra Election 2019 : निष्ठा नसणाऱ्यांना मावळवासीय मतदारांनी जागा दाखवावी : बाळा भेगडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 2:06 PM

अगोदर मी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा मावळा आहे, मग राज्यमंत्री आणि आमदार आहे.

ठळक मुद्देमाझे प्राधान्य, मावळ परिसराच्या सर्वांगिण विकासाला

तळेगाव दाभाडे : अगोदर मी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा मावळा आहे, मग राज्यमंत्री आणि आमदार आहे. त्यामुळे माझ्या अंगात निष्ठा आहे म्हणून मी पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही, त्यांना मावळवासीय मतदारांनी जागा दाखवावी, असे आवाहन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी प्रचारात व्यक्त केले. आंदर मावळमध्ये राज्यमंत्री भेगडे यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरमरवस्ती, टाकवे बुद्रुक, फळने, माऊ, वडेश्वर, नागथली, वाउंड, कचरेवाडी, देशमुखवाडी, घोणशेत, वाहनगाव, बोरवली, तळपेवाडी आदी गावांतील ग्रामस्थांशी भेगडे यांनी संवाद साधला. या वेळी स्थानिक रहिवासी व नागरिकांनी विकासकामांबद्दल कौतुक करीत राज्यमंत्री भेगडे यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना भेगडे म्हणाले,‘‘मी विरोधाला व विरोधकांना महत्त्व देत नाही. माझे प्राधान्य मावळ परिसराच्या सर्वांगिण विकासाला आहे. भूमिपूत्र म्हणून मी इथल्या जनतेशी व त्यांच्या विकासासाठी बांधील आहे. गावातील लोकांना घरकुल योजना, बांधकाम कामगार योजना, विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.’’.......आम्हाला सत्तेतील मंत्री हवा!४नाणे : नाणे परिसरात फ टाके  आणि ढोल-ताशे यांच्या गजरात राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. बाळाभाऊ भेगडे ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आम्हाला विरोधातील आमदार नको, सत्तेतील मंत्री हवा!’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या गावांमधील ८१७ बांधकाम मजुरांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ४२९ जणांच्या खात्यावर लाभाचा निधी जमा झालेला आहे. अशाच अनेक सोयीसुविधा देण्यासाठी मी बांधील आहे, असे राज्यमंत्री भेगडे यांनी सांगितले. 

टॅग्स :mavalमावळElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस